निवृत्ती नाईकरे पाटील
कान्हेवाडी बु. ता. खेड येथे ग्रामसभेत खडी मशीन च्या विरोधात 100% ग्रामस्थ्यांचा हात वर करून विरोध!!
कान्हेवाडी ता. खेड येथे खडी मशीन सुरु करण्याच्या परवानगी साठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत खडी मशीनच्या ठरवा विरोधात 100% ग्रामस्थानी विरोध केला असून, ग्रामस्थानी एकजूट दाखवून दिली.
खेडचे प्रांतधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली.
सुरवातीला प्रांत अधिकारी यांनी खडी मशीनला परवानगी मागणाऱ्या शंभू पवार यांना मनोगत व्यक्त करायला सांगितले. शंभू पवार यांनी ग्रामस्थाना गावातील सर्व रस्ते कॉक्रिट करतो. आदिवासी समाजाची घरे बांधून देतो. अडीच लक्ष रुपयाचे ग्रामस्थानचे विमे काढतो गावात ज्यांना घरे बांधायची आहेत त्यांना खडी व दगड ना नफा तोटा तत्वावर देतो. अशी आमिष दाखवली.
परंतु निसर्ग व शेतीची हानी होत असेल तर असे नुकसान कारक प्रकल्प आम्हाला गावात नको असे सांगत ग्रामस्थानी या ठरावाला 100% हात वर करून विरोध केला.
यावेळी सरपंच उर्मिला रुके, ऍड. गणेश सहाणे, ऍड. शंकर कोबल, उद्योजक दिलीप आंबेकर, मा. सरपंच बी. डी कोबल, ऍड गिरीश कोबल, सामाजिक कार्यकर्ते दत्ता रुके व मा. पोलीस निरीक्षक पांडुरंग सहाणे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी ग्रामसभेला महिला पुरुष यासह युवक वर्ग असे अंदाजे 350 ते 400 ग्रामस्थ उपस्थित होते.









