दिवेआगार येथे समुद्रात आळंदी येथील 8 विध्यार्थी बुडाले.


 

दिवेआगार येथे समुद्रात आळंदी येथील 8 विध्यार्थी बुडाले.

१ ऑक्टोबर २०२६ (गुरुवार) रोजी रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर घडली आहे.

पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’ खाजगी कोचिंग क्लासचे ११ वी आणि १२ वी सायन्सचे विद्यार्थी सहलीसाठी गेले होते. या सहलीमध्ये एकूण ४८ जण (२५ मुले, १७ मुली आणि ६ शिक्षक) सहभागी होते.

समुद्रात पोहताना पाण्याचा आणि भरतीचा योग्य अंदाज न आल्यामुळे जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने ८ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
स्थानिक नागरिक, पोलीस आणि वॉटर स्पोर्ट्स कर्मचाऱ्यांच्या मदतीने आठही जणांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून ते बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत.

या भीषण दुर्घटनेमुळे आळंदी शहर आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


19
कृपया वोट करें

शेतकरी बाप लेक कि खबर के बारे में अपनी राय व्यक्त करें

हे देखील पहा...

error: Content is protected !!