किसान सभेची तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन आंदोलन
खेड, दि. २३ : अखिल भारतीय किसान सभा खेड तालुका समिती व आदिवासी ठाकर समाज युवा संघटना यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी नियमित कर्जदारांना दोन लाख रुपये अनुदान मिळाले पाहिजे, देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर झाली पाहिजेत, गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर झाली पाहिजेत, बुरसेवाडी येथील ठाकर समाजाच्या कुटुंबियांना मदत मिळाली पाहिजे, तसेच तेथील कुटुंबांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी व अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. नायब तहसीलदार मोरे साहेब यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी किसान सभेचे तालुका अध्यक्ष आमोद गरूड, तालुका सचिव निलेश भुजबळ, पांडुरंग बुरसे, मारूती रोडे, गायरान जमिनी कसणारे भाऊसाहेब भोंडवे, प्रमोद ढोबळे, अभिजीत भुजबळ, दत्तात्रय गोरे, आदिवासी ठाकर समाज युवा संघटनेचे अध्यक्ष रोहिदास गावडे, दीपक भांगे, शिवाजी पितांबरे, शिरीष पारधी, बाळू पारधी, देवस्थान ईनाम वर्ग 3 चे शेतकरी असलम शेख, अकबर मुलानी, अजमुद्दीन इनामदार, SFI चे नवनाथ मोरे आदींसह उपस्थित होते.









