माजी जिल्हा परिषद सदस्या व निर्भीड सामाजिक कार्यकर्त्यां आशाताई दत्तात्रय बुचके यांचे मुबंई येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी पहाटे 5 वाजता निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच जुन्नर सह पुणे जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून हळ हळ व्यक्त करण्यात आली.
स्पष्टवक्ते पणा व लढाऊ महिला नेत्या म्हणून त्यांचा जुन्नर व पुणे जिल्ह्यात दबदबा होता. जुन्नर तालुक्यातील जनता एका लढाऊ नेतृत्वाला हरपली आहे.









