निवृत्ती नाईकरे पाटील
पीडीसीसी बँकेच्या निवडूकीत आंबेगाव तालुक्यातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील?
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आंबेगाव तालुका प्रतिनिधी म्हणून माजी खासदार आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनीच आढळराव यांच्या नावाला पसंती दर्शवल्याची चर्चा तालुक्यातील सुरु आहे. त्यांच्या या उमेदवारीमुळे तालुक्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळात नवा उत्साह पाहायला मिळत आहे.
आंबेगाव तालुक्यातील शेतकरी, विविध कार्यकारी सोसायट्या आणि सहकार चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी आढळराव पाटील यांच्या अनुभवाचा मोठा फायदा बँकेला होईल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि सहकार क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.









