निवृत्ती नाईकरे पाटील
वेड्या बहिणीची वेडी ही माया, हप्ता आला म्हणून तीला रोज फसवतोय सोशल मीडियावरचा भाऊराया.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील करोडो महिलाशी थेट जोडलेली असल्यामुळे, चॅनेल वाल्यांना माहित आहे. या विषयावरील बातम्याना सर्वात जास्त पाहिले जाते.
यामुळे बऱ्याचदा तारीख निश्चित नसताना किंवा अधिकृत घोषणा नसताना, आज हप्ता जमा होणार. दोन महिन्याचे 3000 एकत्र मिळणार. या मथाळ्याखाली फेक बातम्या प्रसिद्ध केल्या जातात.महिला भगिनींकडून या बातम्या मोठया आशेने पाहिल्या जातात.
महिला भगिनींनो फेक बातम्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या खात्यात पैसे जमा झाल्यावर बँकेचा अधिकृत मॅसेज येतच असतो. त्यावर विश्वास ठेवा व मनस्ताप टाळा.
लाडक्या बहिणीची बातमी दिसली की, महिला भगिनी मोठया आशेने या बातम्या पाहतात. पण हप्ता जमा नाही झाला की त्यांच्या हिरमोड होतो. यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की फेक बातम्यावर विश्वास ठेऊ नका.
बातमी आवडल्यास इतरांना शेअर करायला विसरू नका.









